मराठी सोपे शब्द

Tuesday, 2 February 2016

मराठी दिन मराठी नाटक स्क्रिप्ट

केतन कानाला वॉकमन लावुन बसतो. गाणी ऐकता ऐकता तो मोठ्मोठ्यांदा गाणं गुणगुणू लागतो…

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...”

गाणं म्हणत असतानाच त्याचं लक्ष हसणार्‍या अनुकडे जात.

केतन : (इयर-प्लग काढत) “काय झालं?”
अनु : “ अहो.. घरात काम आहे आपल्या.. कश्याला गाणी म्हणताय.. राहु द्या.. बंद करा ती गाणी..”

केतन इकडे तिकडे बघतो.. आजुबाजुला कोणीच नसते.

केतन : कोण मी?
अनु : हो मग? दुसरं कोणी आहे का इथं?
केतन : मला वाटलं तु माझ्याशी बोलत नाहीयेस..
अनु : ऍक्च्युअली नां, मी विचार केला.. मला मदत मान्य आहे आज दिवस कोणता ?
केतन : “आज  २७ फ़ेब्रुअर्य ” आज मराठी भाषा दिन. त्यामुळे कविवर्य सुरेश भटांच्या या काव्यपंक्ती आज पुन्हा एकदा मनात रुंजी घालत आहेत
अनु : “हो ना .ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो."

केतन लगेच खुर्चीत ताठ होऊन बसतो.

केतन : “आज कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीवर्षाला सुरुवात होत आहे. कुसुमग्राचांच्या “विशाखा” काव्यसंग्रहाने मराठी काव्याला एक नवं परिमाण बहाल केले. कोलंबसचे गर्व गीत, वेडात मराठे वीर दौडले सात, पृथ्वीचे प्रेमगीत, गर्जा जयजयकार या कविता म्हणजे अक्षर वाडमयच. कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला यासारखी नाटकं. वैष्णव, जान्हवी आणि कल्पनेच्या तीरावर कादंबरी यासारख्या साहित्यकृतींनी भारतीय साहित्याला समृध्द केलं आहे.”
अनु : “पण मी म्हणते.. कुसुमाग्रजांच्या जन्मस्थानी पुण्यात विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातल्या सदाशिवपेठेतील त्यांच्या जन्मठिकाणी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी गरजा जयजयकार क्रांतीचा ही कविता म्हणून त्यांना आदरांजली वाहिली.

केतन : “अरेच्या.. पण काल एकण्यात आले विविध शाळांमधील विद्यार्थी त्याचप्रमाणे इतिहासप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ नाटककार ,अभिनेते श्रीराम लागू आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी कवी कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली. यावेळी श्रीराम लागूंनी कुसुमाग्रजांबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या.
अनु : “असं काही नाही.. आता तुच बघ ना.. फेसबुककर आणि एकंदर सर्वच नेटीझन्स चा मराठी भाषेविषयी असलेला आदर वाखाणण्या जोगा आहे..
आज तागायत तब्बल २००० हून अधिक मराठी भाषेविषयी आदर व्यक्त करणार्‍या फेसबुककर/नेटीझन्सनी ‘मराठी भाषा दिवस’ या उपक्रमात सहभाग नोंदविलेला आहे.
केतन : आरे वा ! मराठी भाषा नेतीझेंस ने पुन उचलून दारली
अनु : माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज


jyotsna bhalerao



Posted by Prabha- The Sunrise at 08:22
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Blog Archive

  • ►  2019 (2)
    • ►  September (2)
  • ►  2018 (1)
    • ►  March (1)
  • ►  2017 (1)
    • ►  May (1)
  • ▼  2016 (1)
    • ▼  February (1)
      • मराठी दिन मराठी नाटक स्क्रिप्ट

About Me

Prabha- The Sunrise
View my complete profile
Picture Window theme. Powered by Blogger.